जिल्ह्यात करोनाचा उद्रेक; आज 90 बळी

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक; आज 90 बळी

24 तासात 6 हजार 257 पॉझिटिव्ह

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून दाखल तसेच पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना आता जिल्ह्याने मृत्युमध्ये आघाडी घेतली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात आतापर्यंतचे विक्रमी 90 करोनोबळी गेले आहेत. यातील सर्वाधिक 46 हे ग्रामिण भागातील आहेत तर 41 नाशिक शहरातील आहेत. याबरोबरच कोरोना पॉझिटिव्हमध्ये मोठी वाढ असून दिवसभरात 6 हजार 257 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. रविवारी यात वाढ दिड हजारने घट झाली होती पंरतु पुन्हा एक हजाराची वाढ झाली आहे. मागील चोवीस तासात 3 हजार 740 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 2 लाख 34 हजार 86 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 6 हजार 257 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 3 हजार 736 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 70 हजार 686 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 2 हजार 310 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 96 हजार 788 झाला आहे. मालेगावात 131 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 10 हजार 613 झाला आहेे. जिल्हा बाह्य 80 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 3 हजार 790 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये दररोज मोठी वाढ होत असून आज जिल्ह्यात कोरोना सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात विक्रमी 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 46 रूग्ण आहेत, शहरातील 41 , मालेगाव 1 व जिल्हाबाह्य 2 रूग्णांचा सामावेश आहे. या मृतांमध्ये डॉ. जाकीर हुसेन रूग्णायात झालेल्या घटनेतील मृतांचा सामावेश असल्याने ही वाढ असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी मंगळवारी जिल्ह्यात 57 मृत्यू होते. यामध्ये 33 ने वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 3 हजार 122 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढतत चालला असून मागील चोवीस तासात 5 हजार 822 नवे संशयित दाखल झाले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 2,81,877

* नाशिक : 1,70,686

* मालेगाव : 10,613

* उर्वरित जिल्हा : 96,788

* जिल्हा बाह्य ः 3,790

* एकूण मृत्यू: 3,122

* करोना मुक्त : 2,34,086

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com