जिल्ह्यात करोनाचा उद्रेक; आज ३५ बळी

दिवसभरात जिल्ह्यात 5 हजार 67 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
जिल्ह्यात करोनाचा उद्रेक; आज ३५ बळी

नाशिक । प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा मोठा उद्रेक झाला असून यामध्ये नाशिक शहराने सातत्याने आघाडी राखली आहे. शहरातचा आतापर्यंतचा पॉझिटिव्हचा आकडा दीड लाख पार झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात आज दिवस्रात 5 हजार 67 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 35 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. बुधवारी यात अचालक वाढ विक्रमी वाढ होऊन हा आकडा 6 हजार 829 इतका झाला होता. परंतु आज थोडी घट झाली आहे.

परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हचा आकडा 2 लाख 48 हजार 868 वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात 4 हजार 205 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 2 लाख 7 हजार 472 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 5 हजार 67 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 2 हजार 935 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 52 हजार 76 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 1 हजार 998 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 83 हजार 283 झाला आहे. मालेगावात 88 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 10 हजार 69 झाला आहेे. जिल्हा बाह्य 46 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 3 हजार 440 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून आज एकाच दिवसात जिल्ह्यात 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहरातील सर्वाधिक 19, ग्रामिण भागातील 16 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 816 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढतत चालला असून मागील चोवीस तासात 5 हजार 955 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 5हजार 561 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 314 तर मालेगाव येथील 56 रूग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 2,48,868

* नाशिक : 1,52,076

* मालेगाव : 10,069

* उर्वरित जिल्हा : 83,283

* जिल्हा बाह्य ः 3,440

* एकूण मृत्यू: 2,816

* करोना मुक्त : 2,07,472

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com