नाशिक जिल्ह्यात करोनाचा उद्रेक;  आज ५७ बळी

नाशिक जिल्ह्यात करोनाचा उद्रेक; आज ५७ बळी

5 हजार 5 पॉझिटिव्ह, मृत्युचा 3 हजाराचा आकडा पार

नाशिक । प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून दाखल तसेच पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वाढ होत असताना आता जिल्ह्याने मृत्युमध्ये आघाडी घेतली आहे. आज एकाच दिवसात जिल्ह्यात आतापर्यंतचे विक्रमी ५७ करोनोबळी गेले आहेत.

यातील सर्वाधिक 43 हे ग्रामिण भागातील आहेत. यामुळे करोना बळीच्या आकड्याने 3 हजाराचा टप्पा पार केला आहे. तर दिवसभरात 5 हजार 5 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पोहचला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह येणारांची संख्या 2 लाख 75 हजार 620 इतकी झाली आहे.

नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. सोमवारी यात वाढ होऊन हा आकडा 6 हजार 845 इतका झाला होता. परंतु आज यात दिड हजारने घट झाली आहे. मागील चोवीस तासात 3 हजार 861 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 2 लाख 30 हजार 346 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 5 हजार 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 2 हजार 777 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 66 हजार 950 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 2 हजार 167 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 94 हजार 478 झाला आहे. मालेगावात 21 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 10 हजार 482 झाला आहेे. जिल्हा बाह्य 40 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 3 हजार 710 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून आज जिल्ह्यात करोना सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वात विक्रमी 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 43 रूग्ण आहेत, शहरातील 9 , मालेगाव 3 व जिल्हाबाह्य 2 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 3 हजार 32 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढतत चालला असून मागील चोवीस तासात 4 हजार 517 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 4 हजार 125 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 318 तर मालेगाव येथील 51 रूग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 2,75,620

* नाशिक : 1,66,950

* मालेगाव : 10,482

* उर्वरित जिल्हा : 94,478

* जिल्हा बाह्य ः 3,710

* एकूण मृत्यू: 3,032

* करोना मुक्त : 2,30,346

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com