Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मालेगावनंतर सर्वाधिक रुग्ण 'या' तालुक्यात

नाशिक मालेगावनंतर सर्वाधिक रुग्ण ‘या’ तालुक्यात

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

सिन्नर तालुक्यात आज (दि.२६) रोजी नवे दहा रुग्ण आढळले आहेत. तालुक्‍यातील आजपर्यंतच्या करोना बाधितांचा आकडा पाचशेचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. यामुळे नाशिक आणि मालेगावनंतर सर्वाधिक रुग्ण आता सिन्नर तालुक्यात आहेत.

- Advertisement -

आज सिन्नर शहरात 6 नवीन रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात 4 रुग्णांची भर पडली आहे. शहरातील कमल नगर येथे 41 वर्षीय पुरुष, संजीवनी नगर भागात 72 वर्षीय महिला, काकड मळ्यात 39 वर्षीय पुरुष, विठ्ठल मंदिर 32 वर्षीय पुरुष, वाजे पेट्रोल पंपाजवळ 42 वर्षीय पुरुष, लिंगटांग वाडीत 30 वर्षीय पुरुष करोना बाधित निघाले आहेत.

ग्रामीण भागात कुंदेवाडी येथे 28 वर्षीय पुरुष, विंचूर दळवी येथे 35 वर्षीय पुरुष तर पाथरे येथे 28 वर्षीय व तीस वर्षीय पुरुष पॉझिटिव निघाले आहेत. हे सर्व रिपोर्ट खाजगी लॅब मधील आहेत. आजच्या या दहारुग्णांमुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 502 झाली आहे.

करोना बाधितांच्या संख्येत नाशिक शहर व मालेगाव नंतर सर्वाधिक रुग्ण असलेला सिन्नर तालुका जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 502 झाली असून त्यातील 341 रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बारा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 149 रुग्णांवर सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात व नाशिकच्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या