जिल्ह्यात करोनाचा उद्रेक; आज ४१ बळी

आज 4 हजार 435 पॉझिटिव्ह रूग्ण
जिल्ह्यात करोनाचा उद्रेक; आज ४१ बळी

नाशिक । प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून यामध्ये नाशिक शहराने सातत्याने आघाडी राखली आहे. याबरोबर ग्रामीण भागात हा प्रसार वाढला असून आज एकाच दिवसात आतापर्यंतचे विक्रमी 41 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील 26 रूग्ण आहेत. दरम्यान जिल्ह्यात आज दिवसभरात 4 हजार 435 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्याने अडीच लाखाचा टप्पा पार केला आहे.

नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. बुधवारी यात अचानक वाढ विक्रमी वाढ होऊन हा आकडा 6 हजार 829 इतका झाला होता. परंतु आज थोडी घट झाली आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हचा आकडा 2 लाख 53 हजार 303 वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात 4 हजार 596 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 2 लाख 12 हजार 68 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 4 हजार 435 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 2 हजार 403 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 54 हजार 479 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 1 हजार 832 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 85 हजार 115 झाला आहे. मालेगावात 150 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 10 हजार 219 झाला आहेे. जिल्हा बाह्य 50 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 3 हजार 490 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून आज एकाच दिवसात जिल्ह्यात आतापर्यंचा विक्रमी 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 26 रूग्ण, नाशिक शहरातील 9, मालेगाव 4 तर जिल्हा बाह्य 2 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 857 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढतत चालला असून मागील चोवीस तासात 4 हजार 777 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 4हजार 370 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 297 तर मालेगाव येथील 73 रूग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 2,53,303

* नाशिक : 1,54,479

* मालेगाव : 10,219

* उर्वरित जिल्हा : 85,115

* जिल्हा बाह्य ः 3,490

* एकूण मृत्यू: 2,857

* करोना मुक्त : 2,12,068

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com