नाशिक | प्रतिनिधी

कराेनाचा फेरा असतानाही गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी नाशिककरांनी दाखवलेली बेफिकीरी आज त्यांच्याच मुळावर उठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या जिल्ह्यात नाशिक शहर कराेनाचे हाॅटस्पाॅट बनले असून शहरातून राेज साडेतीन हजारांहून आधिक रुग्ण पाॅझिटिव्ह मिळत आहे. बुधवारी (दि. ७) नाशिक जिल्ह्यात ४ हजार १२२ नवे बाधित आढळले असून एकूण ६ हजार ६०० अहवाल प्रलंबित आहेत.

नाशिक शहरात कराेनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातच मृत्यूचा आकडाही शहरात वाढत आहे.(दि. ७) शहरात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला असून ग्रामीणमध्ये ९ तर, बाह्यमध्ये ४ अशा २४ जणांच्या मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात कराेनाने २५५३ जणांचा मृत्यू झाला असून महापालिका हद्दीत मृतांची संख्या १२१४ वर पाेहचली आहे. कराेना कहर वाढत चालल्याने शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीदेखील काही नागरिक नियम माेडण्यात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात सध्या उपचार घेणारे रुग्ण- ३२ हजार ४१०

काल बरे झालेले रुग्ण-३८५६

काल नाशिक मनपा रुग्णालयात दाखल रुग्ण-३४०६

मालेगाव मनपा-५९

नाशिक ग्रामीण-३०२

एकूण दाखल-३८००