Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCoronavirus : भारतात २४ तासांत चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद तर ३.८६...

Coronavirus : भारतात २४ तासांत चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद तर ३.८६ लाख करोनामुक्त

दिल्ली l Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असून लागोपाठ चौथ्या दिवशी चार लाखांपेक्षा जास्त नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. करोनामुळे मृत्यू होण्याची संख्या वाढली असून मृतांच्या संख्येनेही आपला विक्रम मोडला आहे. मृत्यूंचा आकडा स्थिरावत नसून तो सतत वाढत आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात ४ लाख ०३ हजार ७३८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या २ कोटी २२ लाख ९६ हजार ४१४ इतकी झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल : तिसऱ्या लाटेत मुले संक्रमित झाली तर आई-वडील काय करणार?

तसेच गेल्या २४ तासात ३ लाख ८६ हजार ४४४ जण उपचारानंतर बरे झाले असून ४ हजार ०९२ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी ८३ लाख १७ हजार ४०४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३७ लाख ३६ हजार ६४८ इतकी झाली असून मृतांची संख्या २ लाख ४२ हजार ३६२ इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत १६ कोटी ९४ लाख ३९ हजार ६६३ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात राज्यात ८२ हजार २६६ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ५३ हजार ६०५ नवीन करोनाबाधित आढळले असून, ८६४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात एकूण ४३ लाख ४७ हजार ५९२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.०३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या