Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : देशात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट मात्र मृतांची संख्या चिंताजनक

COVID19 : देशात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट मात्र मृतांची संख्या चिंताजनक

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वेगाने पसरत आहे.

- Advertisement -

परंतु आता सर्व वातावरणात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घट झाली आहे. मात्र मृतांच्या संख्येत सातत्यानं वाढ पाहायला मिळत आहे. भारतात गेल्या २४ तासांत तीन लाखांपेक्षा कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. पण मृताची संख्या चार हजारांपेक्षा जास्त आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे करोना रुग्ण आढळले असून ४ हजार १०६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ४९ लाख ६५ हजार ४६३ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ७४ हजार ३९० वर पोहोचली आहे.

Sputnik V लसीची दुसरी खेप भारतात दाखल; Sputnik V Lite लवकरच दाखल होणार?

तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख ७८ हजार ७४१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ११ लाख ७४ हजार ०७६ वर पोहचली आहे.

देशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या देशात १८ कोटी २९ लाख २६ हजार ४६० जणांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

तसेच राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा देण्यात येणार असून त्यांच्याकडे अजून १.८४ कोटी मात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत २० कोटी लसमात्रा राज्यांना मोफत पुरवल्या आहेत. एकूण पुरवलेल्या लसमात्रांची संख्या २० कोटी २८ लाख ९ हजार २५० अशी आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचा आलेख घसरू लागला आहे. राज्यात काल करोनाचे ३४ हजार ३८९ नवे रुग्ण आढळले. मात्र, करोनाबळींची संख्या वाढली आहे. याच कालावधीत ९७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक मृत्युसंख्या आहे. मृतांमधील ४१५ मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील असून, त्यांची नोंद रविवारी झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या