Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशदिलासादायक! देशात १५ एप्रिल नंतर पहिल्यांदाच करोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या खाली

दिलासादायक! देशात १५ एप्रिल नंतर पहिल्यांदाच करोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या खाली

दिल्ली | Delhi

गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाने थैैमान घातले होत. मात्र दिवसागणिक वाढणारी करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही २६ लाखांच्या खाली आहे. देशातील मृतांची दररोजची सरासरी देखील खाली येताना दिसत असून, एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १ लाख ९६ हजार ४२७ नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार ५११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ६९ लाख ४८ हजार ८७४ इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख ०७ हजार २३१ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख २६ हजार ८५० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ४० लाख ५४ हजार ८६१ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

गेल्या २४ तासांत सर्वाधिक महाराष्ट्रातही रुग्ण संख्या कमी झाली आहे. मात्र करोनाबळींची संख्या कमी होताना दिसत नाही आहे. राज्यात करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२.५१ टक्क्यांवर पोहोचलं आहे. गेल्या २४ तासात ४२ हजार ३२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ५१ लाख ८२ हजार ५९२ रुग्ण बरे झाले आहेत. तर मागच्या २४ तासात २२ हजार १२२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के इतका आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या