COVID19 : देशात नव्या रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक, पण...

महाराष्ट्रातील स्थिती काय?
COVID19 : देशात नव्या रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक, पण...

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र दिलासादायक गोष्ट म्हणजे गेल्या दोन दिवसात सलग करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख २६ हजार ०९८ नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार ८९० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ४३ लाख ७२ हजार ९०७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ६६ हजार २०७ वर पोहोचली आहे.

तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख ५३ हजार २९९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ०४ लाख ३२ हजार ८९८ वर पोहचली आहे.

दरम्यान ICMRने दिलेल्या माहितीनुसार, देशात शुक्रवारी एका दिवसात १६ लाख ९३ हजार ९३ जणांची करोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशात ३१ कोटी ३० लाख १७ हजार १९३ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

तसेच देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण १८ कोटी ०४ लाख ५७ हजार ५७९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील २० लाख २७ हजार १६२ लसीचे डोस शुक्रवारी देण्यात आले.

देशात सर्वाधिक रुग्णसंख्येत कर्नाटक अग्रस्थानी आहे. कर्नाटकात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कर्नाटकात मागील २४ तासांत ४१ हजार ७७९ रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात ३९ हजार ९२३ नवीन रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही राज्यांबरोबरच केरळमध्ये ३४ हजार ६९४, तामिळनाडू ३१ हजार ८९२, आंध्र प्रदेश २२ हजार १८ रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ५२.२२ टक्के रुग्ण या पाच राज्यांमधील आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात काल ३९ हजार ९२३ नवे करोनाबाधित आढळले असून ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांमध्य हे प्रमाण वाढल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट आता ८८.६८ टक्क्यांवर गेला आहे. राज्यात आत्तापर्यंत करोनाबाधितांचा आकडा ५३ लाख ९ हजार २१५ इतका झाला आहे, तर त्यातल्या ४७ लाख ७ हजार ९८० रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यापैकी सध्या राज्यात ५ लाख १९ हजार २५४ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच काल दिवसभरात राज्यात ६९५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात एकूण मृतांचा आकडा ७९ हजार ५५२ इतका झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com