Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : देशात आतापर्यंत २ कोटींहून अधिक रुग्ण करोनामुक्त, महाराष्ट्रातील स्थिती...

COVID19 : देशात आतापर्यंत २ कोटींहून अधिक रुग्ण करोनामुक्त, महाराष्ट्रातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

करोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. देशात गेल्या २४ तासात तीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहे. पण दिलासादायक वृत्त आजपर्यंत २ कोटींहून अधिक रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४३ हजार १४४ नवे करोना रुग्ण आढळले असून ४ हजार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ४० लाख ४६ हजार ८०९ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ६३ हजार ३१७ वर पोहोचली आहे.

तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ७९ हजार ५९९ वर पोहचली आहे.

देशात आतापर्यंत एकूण १७ कोटी ९२ लाख ९८ हजार ५८४ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील २० लाख २७ हजार १६२ लसीचे डोस गुरुवारी देण्यात आले.

ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, १३ मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३१ कोटी १३ लाख २४ हजार १०० नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १८ लाख ७५ हजार ५१५ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात अर्थात गुरुवारी करण्यात आली.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रात काल उपचारानंतर बरे झालेल्या ५४ हजार ५३५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आज ४२ हजार ५८२ नव्या करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान ८५० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या