करोना संसर्गाचा वेग तीन पटीने

करोना लसीकरणाचा वेग वाढवा: मुख्यमंत्री
करोना संसर्गाचा वेग तीन पटीने

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यात गेल्या सहा दिवसात करोना (corona) रुग्णांची संख्या तिपटीने वाढल्याची धक्कादायक माहिती सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने (Department of Public Health) राज्य मंत्रिमंडळाला देण्यात आली. जानेवारीच्या मध्यात करोनाच्या सक्रिय रुग्णात (Active patient) वाढ होण्याची शक्यताही विभागाने वर्तवली.

8 डिसेंबर रोजी राज्यात करोनाचे 6 हजार 200 सक्रिय रुग्ण होते. मात्र आज 10 हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या 20 दिवसात सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ झाली असून राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास (Additional Chief Secretary Dr. Pradeep Vyas) यांनी दिली.

यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी करोनाचा संसर्ग (Corona infection) वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पावले उचलावी लागणार असून टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी डॉ. व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोरोनाच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून त्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला आठ लाख डोसेस देत होतो. सद्या दिवसाला पाच लाख डोसेस दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण (vaccination) वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिले.

26 नवे ओमायक्रॉनबाधित

राज्यात आज 26 नवे ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. मुंबईमध्ये एकूण 11 ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. त्यानंतर रायगड जिल्ह्यात (पनवेल पालिका) 5 , ठाणे पालिका भागात 4 आणि नांदेडमध्ये 2 तर नागपूर, पालघर, भिवंडी निमामपूर आणि पुणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी 1 ओमायक्रॉनबाधित आढळला आहे. नव्याने आढळलेल्या या रुग्णांमुळे राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या 167 झाली आहे.

Related Stories

No stories found.