Friday, April 26, 2024
Homeनाशिककरोनासाठी आरोग्य विभागातील कायम स्वरुपी पदे भरा

करोनासाठी आरोग्य विभागातील कायम स्वरुपी पदे भरा

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका आस्थापनावरील मंजुर पदावरील सव्वा दोन हजारावर अधिकारी व कर्मचारी हे सेवानिवृत्त-स्वेच्छानिवृत्तीने कमी झाले असुन या रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाही. यात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वपुर्ण भूमिका पार पाडणारे एकही फिजिशिय महापालिकेकडे नाही…

- Advertisement -

तसेच करोनाचे वाढते रुग्ण व रुग्णालयात पुरशे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारीच उपलब्ध नसल्याने करोना प्र्रादुर्भाव व करोनाग्रस्तांचा मृत्यु होत असल्याचा होत आहे.

हे संकट लक्षात घेऊन आता तरी शासनाने महापालिकेला आरोग्य विभागातील मंजुर पदे कायम स्वरुपी भरावीत अशी मागणी पुढे आली आहे.

नाशिक महापालिकेच्या आस्थापनावरील मंजुर पदांपैकी रिक्त असलेली 2244 पदे भरण्याचे काम कोणत्याही आयुक्तांनी केलेले नाही. आस्थापना खर्च वाढल्याचे कारण देत नवीन भरतीस नकार देण्यात आल्याने महापालिका कर्मचार्‍यांवर मोठा ताण पडला आहे.

याच पार्श्वभूमीवर आलेल्या करोना संकटाशी सामना करतांना महापालिकेचे नाकेनऊ येत आहे. या संकटाला तोंड देतांना महापालिकेकडे एकही फिजीशियन नसल्याचे वास्तव समार आले आहे.

करोना आजार छातीशी संबंधीत असल्याने याकरिता फिजीशियन वैद्यकिय अधिकार्‍यांची गरज असतांना अद्यापही हे कायम स्वरुपी पद भरण्यात आलेले नाही.

मात्र, शासनाने तीन महिन्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागात मानधनावर डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ यासह 15 सवंर्गातील 839 पदे भरण्यास परवानगी दिली. याकरीता अनेकदा जाहीरात देऊनही डॉक्टर व इतर पदावरील उमेदवार तात्पुरत्या भरतीसाठी पुढे यायला तयार नाही.

यात मानधन वाढवून दिल्यानंतर थेट मुलाखतींसाठी 555 उमेदवार आले, मात्र एकुणच रुग्णालयातील स्थिती व संरक्षणासाठी असलेले अपुर्ण सोयी सुविधा लक्षात घेऊन अनेक जण हजर झाले नाही.

तर काही जण हजर होऊन गायब झाल आहे. परिणामी आता शहरातील गंभीर स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने पुन्हा मानधनावरील ही भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या नुकत्यास झालेल्या स्थायी समिती व महासभेत महापालिका आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले. यात रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारीच उपस्थित राहत नसल्याचा आरोग नगरसेवकांनी केला आहे.

तसेच लाखो रुपयांचे मानधन देऊन काही तासांसाठी बोलविण्यात आलेले डॉक्टर सोयीनुसार रुग्णांकडे येत असल्याचा आरोप देखील झाला आहे. याचा अर्थ आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणाचाच वचक नसल्याची गंभीर बाब समोर आली असुन अधिकारी व वैद्यकिय अधिकारी यांच्या समन्वय नसल्याने शहरातील परिस्थीती गंभीर बनली आहे.

या एकुण कारभाराबद्दल सभापती गणेश गिते व महापौर सतिश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकुणच करोनाची स्थिती पाहता आरोग्य विभागातील रिक्त पदे कायम स्वरुपी भरण्यासाठी शासनाकडुन परवानगी घ्यावी अशी मागणी महापालिकेतील पदाधिकार्‍यांनी केली आहे.

आरोग्य विभागात केवळ 336 मनुष्यबळ

महापालिकेच्या सार्वजनिक विभागात 336 वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, वार्डबॉय, आया अशी पदे असुन ही सद्याची करोनाची स्थिती पाहता कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ केअर व कोविड रुग्णालयासाठी अपुर्ण आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय व एनएचएम यांच्याकडुन 310 मनुष्यबळ महापालिका क्षेत्रात कार्यरत झाल्यामुळे काही मदत मिळाली आहे. तर मानधनावरील भरतीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

अशाप्रकारे शहरात करोना रुग्णांचा आकडा शिखराकडे जात असतांना व बळीची संख्या वाढत असतांना डॉक्टर व स्टॉफची कमरतात, हे येणार्‍या काळात संकट तर ठरणार नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या