नाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा १५ हजार पार
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा १५ हजार पार

२४ तासात ६०३ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा तसेच शहरात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 603 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्ताचा आकडा 15 हजार 19 इतका झाला आहे.

तर दुसरीकडे एकाच दिवसात जिल्ह्यातून 905 नवे संशयित दाखल झाले आहेत. आज जिल्ह्यातील 6 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण 603 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 397 रूग्ण आहेत. यात शहरातील नाशिकरोड, पंचवटी, सातपुर गाव, दसक, उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, हिरावाडी, पेठरोड, जुने नाशिक, वडाळारोड येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा 9 हजार 808 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 178 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 3 हजार 714 झाला आहे. यामध्ये सर्वाधिक सिन्नर, सुरगाणा, नांदुर खुर्द, राणमळा, विंचुर, वणी, पिंपळगाव बसवंत, रावळगाव, उमराळे, येवला, इगतपुरी, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, नांदगाव, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत. मालेगावत आज 28 रूग्ण आढळले आहेत.

यामुळे मालेगावचा आकडा 1 हजार 335 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 162 झाला आहे. तर करोनामुळे आज दिवसभरात 6 जणांचा मत्यू झाला. यामध्ये नाशिक शहरातील सर्वजन आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 505 झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील 217 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 11 हजार 344 वर पोहचला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा मात्र वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने 905 संशित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक 734 तर ग्रामिण जिल्ह्यातील 118 आहेत. जिल्हा रूग्णालय 5, मालेगाव 22, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 21 व होम कोरोंटाईन 5 रूग्णांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित: 15,019

* नाशिक : 9808

* मालेगाव : 1335

* उर्वरित जिल्हा : 3714

* जिल्हा बाह्य : 162

* एकूण मृत्यू: 505

* करोनामुक्त : 11344

Deshdoot
www.deshdoot.com