Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण ३ लाखांवर

उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण ३ लाखांवर

नाशिक ।

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मोठी चिंता वाढली आहे. देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांमध्ये नाशिक व जळगावचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्हे मिळून ३ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण झाले आहेत. त्यातील ४ हजार ६२८ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सलग प्रतिदिन दोन हजारपेक्षा अधिक नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या १ लाख ३५ हजार ६४९ वर गेली आहे. मृत्यूदरही वाढला असून आतापर्यंत १५ हजार ७१० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७९ हजार ३४४ वर गेली आहे. तसेच ४ हजार ९५९ जणांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्यात २४ मार्चपर्यंत ७० हजार ५२ रुग्ण झाले होते. तसेच ६ हजार ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यात आता ४१७ रुग्ण आहे.

धुळे जिल्ह्यात १८ हजार ५९४ जणांना कोरोनाची लागल झाली होती. त्यातील ३ हजार ४५ जणांचा मृत्यू झाला. नंदुरबार जिल्ह्यात १४ हजार ९२० रुग्ण होते. त्यातील २४४ जणांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात आता ६१८ रुग्ण आहे.

शहर एकूण रुग्ण सध्याचे रुग्ण मृत्यू

नाशिक 46639 521 852

नाशिक मनपा 100385 947 1119

मालेगाव मनपा 6479 34 172

नगर 55460 456 763

नगर मनपा 30032 222 425

धुळे 11040 238 191

धळे मनपा 10942 179 150

जळगाव 56982 941 1211

जळगाव मनपा 20744 163 353

नंदुरबार 14920 618 244

- Advertisment -

ताज्या बातम्या