नाशिक । प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढीस लागला आहे. नव्याने दाखल होणार्या संशयितांचा वाढत आहे. तसेच पॉझिटिव्ह रूग्णांचाही आकडा वाढत चालला आहे. मागील चोवीस तासात काही आकडा घसरला असल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात 256 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा 1 लाख 428 वर पोहचला आहे.

हेही वाचा : ओझर विमानतळावर आढळले तीन करोना पाॅझिटिव्ह

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार, मागील 24 तासात 256 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 123 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 66 हजार 253 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 115 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 29 हजार 25 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 8 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत यामुळे मालेगावचा आकडा 4 हजार 315 झाला आहेे. जिल्हा बाह्य 10 रूग्ण आढळल्याने त्यांचा आकडा 835 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 185 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 95 हजार 811 झाला आहे.

आज दिवसभरात 3 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्व 3 ग्रामिण भागातील आहेत. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 785 झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्या संशयितांचा आकडाही आज कमी झाला असून दिवसभरात 754 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. तर अद्याप दिड हजार संशयितांचे अहवाल प्रलंबीत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण करोना बाधित : 1,00,428

नाशिक : 66,253

मालेगाव : 4,315

उर्वरित जिल्हा : 29,025

जिल्हा बाह्य ः 835

एकूण मृत्यू: 1,785

करोनामुक्त : 95,811