अबब ! कोथिंबिरीला मिळाला 'इतका' विक्रमी भाव

अबब ! कोथिंबिरीला मिळाला 'इतका' विक्रमी भाव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी रोड वरील मुख्य बाजार आवारात गुरूवार (दि.२२)  सायंकळच्या लिलावामध्ये कोथिंबिरीला (Coriander Auction )सोळा हजार रुपये शेकडा असा विक्रमी भाव मिळाला.

सध्या जिल्ह्यात अति पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्यातच पितृपक्ष सुरू असल्यामुळेही पालेभाज्यांना मोठी मागणी असल्याने कोथिंबिरीला हा विक्रमी भाव मिळत आहे.

कृषी उपन्न बाजार समितीत नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद ,दरी, मातोरी, मुंगसरा,गिरणारे,गोवर्धन,दूगाव, धोंडेगाव, सिन्नर ,निफाड,दिंडोरी,पेठ,त्रंबकेश्वर तसेच पुण्यातील खेड ,मंचर येथून पालेभाज्याची आवक होत असते.गुरूवारी (दि.२२) सायंकाळी पालेभाज्याचे लिलाव झाले .

शिवांजली कंपनीत पालेभाज्या घेऊन आलेल्या दिंडोरी तालुक्यातील  कोराटे गावातील शेतकरी सोमनाथ शिवाजी भवर हे  कोथंबीर घेऊन आले होते.यांच्या कोथंबीरीस सोळा हजार रुपये  शेकडा असा बाजार भाव मिळाला.ही कोथिंबीर संतोष भुजबळ या व्यापाऱ्याने घेतली असून मुलुंड,भांडुप व ठाणे येथील मार्केटला पाठविणार आहेत.

  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या फळभाज्या व पालेभाज्या या शेतमालाला लिलावाद्वारे योग्य बाजारभाव मिळत असतो. शेतकरी बांधवांनी त्यांचा शेतमाल नाशिक बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा.

- अरुण काळे ,सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com