समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; चौकशी अधिकाऱ्याने केला मोठा दावा

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात रोज वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट (Arbaz Merchant) यांची नावे शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकण्यात आली असा दावा आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह (Dyaneshwar Singh) यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्यामुळे एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती, त्या तपासातील त्रुटींची आणि आरोपांची चौकशी आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंह करत होते. दरम्यान या प्रकरणात आता काही गोष्टी समोर येत असून या प्रकरणाच्या मूळ केस नोटमध्ये बदल करून आर्यन आणि अरबाझ या दोघांची नावे वाढवणात असून काहींची नावे वगळण्यात आली असल्याचा दावा देखील सिंह प्रतिज्ञापत्रात केला आहे.

लोकसभेच्या जिंकलेल्या सर्व १८ जागा लढवणार अन् जिंकणार, संजय राऊतांचा दावा

एनसीबीचा साक्षीदार असलेल्या किरण गोसावीला ही संधी दिल्याच देखील प्रतिज्ञापत्रात म्हंटल आहे. गोसावीवर आर्यन खानला अटक न करण्याच्या बदल्यात २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि ५० लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही छेडछाड केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे.

IPL 2023 : पंजाब किंग्ज-राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; कोण मारणार बाजी?

तर एनसीबीचे अधिकारी मौल्यवान वस्तुंचा पंचनामा न करताच ताब्यात घेत असल्याचे ही या प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे. चौकशीविरोधात समीर वानखेडे यांनी सेंट्रल अॅडमिनिस्ट्रिव्ह ट्रिब्यूनलकडे दाद मागितली असताना सिंह यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. चौकशीअंती वानखेडे यांच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *