धर्मांतराचे रॅकेट चालवणाऱ्याला नाशिकमध्ये अटक

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
धर्मांतराचे रॅकेट चालवणाऱ्याला नाशिकमध्ये अटक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरातील नाशिकरोड Nashikroad परिसरातील आनंद नगर Aanand Nagar या भागात कुणाल चौधरी म्हणून वास्तव्याला असलेल्या आतिफला Aatif उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने Uttar Pradesh Anti-Terrorism Squad अटक केली आहे. जून महिन्यात नोएडा मध्ये घडलेल्या धर्मांतर प्रकरणात अतिफ चा समावेश असल्याचा संशय असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले आहे.

दरम्यान, अतिफ उर्फ कुणाल याच्या बँकेच्या खात्यावर परदेशातून विविध खात्यांमधून तब्बल २० कोटी रुपये आले असल्याचे तपासात समोर आले आहे. संशयित अतिफसह इतर दोन जनांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

मूक बधीर लोकांचे बळजबरी धर्मांतर करून घेणे आणि देशविरोधी कारवाया करण्यास त्यांना प्रवृत्त करणे हा त्यांचा प्रामुख्याने उद्देश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जून महिन्यात हे प्रकरण नोएडा मधून समोर आले होते.

नोएडा मध्ये घडलेल्या घटनेचे कनेक्शन नाशिकमध्ये आल्याने याबाबतच्या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत जातील हे बघणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.