Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानव्या संसद भवनावरून राजकीय हंगामा! उद्घाटनावर ‘हे’ पक्ष घालणार बहिष्कार

नव्या संसद भवनावरून राजकीय हंगामा! उद्घाटनावर ‘हे’ पक्ष घालणार बहिष्कार

दिल्ली | Delhi

संसदेच्या नव्या त्रिकोणाकृती इमारतीचं उद्घाटन येत्या 28 मे रोजी होणार आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी नेमका स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा मुहूर्त शोधल्यानं आधीच वाद सुरू झालाय.

- Advertisement -

त्यात आता भर पडलीय ती नव्या आक्षेपाची. नव्या संसद इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते पार पडणार आहे. मात्र राष्ट्रपती या संसदेच्या पदसिद्ध प्रमुख असल्यानं द्रौपदी मुर्मू Droupadi Murmu, President of India) यांच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवं, अशी विरोधी पक्षांनी घेतलीय.

काँग्रेसकडूनही बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभातून काँग्रेसकडूनही (Congress) बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे नेते पक्षांतर्गत चर्चा करत असून लवकरच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहितीही देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमावर काँग्रेस बहिष्कार टाकू शकते. असे झाले तर उद्घाटन सोहळ्यात काँग्रेसचा एकही नेता उपस्थित राहणार नाही.

सिनेविश्वावर शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू

शिवसेनाही बहिष्कार घालेल – संजय राऊत

शिवसेना ठाकरे गटानं (Shivsena Thackeray Group) तर सोहळ्यावर बहिष्कार (Boycott) टाकण्याचा इशाराच दिलाय. नव्या संसद भवनाच्या (New Parliament Building) उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यास ठाकरेंची शिवसेनाही बहिष्कार घालेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवली पाठ

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित राहणार नाही, पक्षाने या मुद्द्यावर इतर समविचारी विरोधी पक्षांसोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

धक्कादायक! शूटिंग संपवून परतत असताना ट्रकने चिरडले, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

आम आदमी पार्टीचा बहिष्कार

दरम्यान आम आदमी पार्टीनेही मंगळवारी संध्याकाळी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले आहे. पार्टीच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपतींना उद्घाटन सोहळ्याला का बोलावले जात नाही? या प्रश्नांच्या आधारे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पार्टीने म्हटले आहे.

पाच महिन्यात सोयाबीनचे दर १२०० रुपयांनी घसरले, खरीपाच्या तोडांवर शेतकरी हतबल

तसेच, तृणमूल काँग्रेसच्या वतीने राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, तृणमूल काँग्रेस नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाही. तसेच, त्यांनी आपल्या वक्तव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी सर्व काही फक्त ‘मी, माझे आणि मी’ आहे. संसद भवन ही केवळ इमारत नसून ती परंपरा, मूल्ये, आदर्श आणि नियमांचे प्रतिष्ठान आहे, असे डेरेक ओ ब्रायन म्हणाले.

सीपीआय आणि सीपीएम यांच्याकडूनही संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या संसद भवनाच्या भूमिपूजनावेळीही राष्ट्रपतींना बोलावण्यात आलं नव्हतं आणि आताही नाही, अशी टीका सीपीएमचे सचिव सिताराम येचुरी यांनी केली आहे. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात यावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

भीषण अपघात! वीटाने भरलेल्या ट्रॅक्टरची कारला धडक; एकाच कुटूंबातील ५ जणांचा मृत्यू

कसं असेल नवं संसद भवन?

नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी तब्बल 1200 कोटी रुपये खर्च झालेत. सध्याच्या संसदेत 550 लोकसभा आणि 250 राज्यसभा खासदारांसाठी आसनव्यवस्था आहे. मात्र नव्या संसद भवनात 888 लोकसभा आणि 384 राज्यसभा खासदार बसू शकतील. नव्या इमारतीत हायटेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूची पायाभरणी झाली. आता 28 मे 2023 रोजी मोदींच्याच हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणाराय

28 मे रोजी दुपारी बारा वाजता पंतप्रधान मोदी नव्या संसद भवनाचं उद्घाटन करतील. यासाठी सकाळपासूनच हवन पूजेला वैदिक विधी मंत्रोच्चाराने कार्यक्रमाला सुरुवात होईल. लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी नव्या संसद भवानासाठी केंद्र सरकारकडे आग्रह केला होता. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं. चार मजल्यांच्या या इमारतीत 1224 खासदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या