मनपा आयुक्तांविरोधात अवमान याचिका

मनपा आयुक्तांविरोधात अवमान याचिका

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महानगर आयुक्तांनी Metropolitan Commissioner सफाई कर्मचार्‍यांच्या बदल्या प्रकरणी In case of transfer of cleaning staff औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल Contempt petition in the court against the Municipal Commissioner केली आहे. ही याचिका दाखलमान्य करत न्यायालयाने आयुक्तांना 17 जानेवारीला न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

रस्ते सफाईच्या कामासाठी 700 सफाई कामगारांचे आऊटसोर्सिंग करताना तत्कालिन आयुक्त राधाकृष्ण गमे former Commissioner Radhakrishna Gamay यांनी 628 सफाई कर्मचार्‍यांच्या नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम विभागातून अन्य विभागांत बदल्या केल्या होत्या. या बदल्या रद्द करण्याची मागणी संघटनेने आयुक्तांकडे केली होती. मात्र आयुक्तांनी ती मान्य न केल्याने सफाई कर्मचारी विकास युनियनने Sweepers Development Union औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला होता.

औद्योगिक न्यायालयात याचिकाकर्ते व महापालिका प्रशासनाची बाजू ऐकून घेतल्यानंतर सफाई कर्मचार्‍यांच्या बदल्यांना स्थगिती दिली होती. बदलीच्या ठिकाणी हजर न झालेल्या 372 सफाई कर्मचार्‍यांना आहे त्याच ठिकाणी नियुक्ती देण्याचे आदेश दिले होते. मात्र महापालिकेने न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी केली नाही. उलट बदलीच्या ठिकाणी हजर न झालेल्या सफाई कामगारांना वेतन दिले नाही. त्यामुळे संघटनेने आयुक्तांविरोधात कामगार न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.

न्यायाधीश अमृता पाटील यांनी औद्योगिक न्यायालयाचा निकाल आणि संघटनेचे बाजू ऐकून घेतल्यानंतर महापालिकेचेही म्हणणे जाणून घेतले. त्यात संघटनेचा दावा योग्य वाटल्याने आयुक्तांविरोधात अवमान याचिका मान्य केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com