जळगाव jalgaon। प्रतिनिधी
जिल्हा दूध संघातील (District Milk Union) लोणी व दूध पावडरच्या (Loni and milk powder) चोरी व अपहार (Theft and abduction) प्रकरणी कार्यकारी संचालक (executive director) यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार जिल्हा सत्र न्यायालयाचा (Contempt of District Sessions Court)अवमान झाला म्हणून तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, (Superintendent of Police Dr. Praveen Mundhe,) पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) राजकुमार चिंथा आणि शहर पोलीस ठाण्याचे (city police station) सपोनि संदीपसिंग परदेशी, पोलीस निरीक्षक (Police Inspector) विजयकुमार ठाकुरवाड यांना न्यायालयाने नोटीस (court notice) बजावली आहे.
जिल्हा दूध संघामध्ये 14 मेट्रीक टन लोणी व 9 टन दूध पावडरची सुमारे 1 कोटी 15 लाख रुपयांची चोरी व अपहार झाला होता. या विषयाची फिर्याद देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यासमोर आ.एकनाथराव खडसे यांनी चेअरमन मंदाकिनी खडसे, कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह अन्य संचालकांनी ठिय्या आंदोलन केले होते.
या आंदोलनानंतरही पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे कार्यकारी संचालकांनी जिल्हा सत्र न्यायालयात संशयित अनंत अशोक अंबिकर, मनोहर नारायण केदार, सुनील चव्हाण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर निर्णय होण्याआधीच पोलिसांनी पहाटे 3.15 वाजता स्वतः फिर्यादी होवून दूध संघाचे अधिकारी व कर्मचार्यांविरुध्द गुन्हा दाखल केला.
ही बाब मनोज लिमये यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने या प्रकरणात कलम 156 (3) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने आदेश देवून देखील पोलिसांनी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची फिर्याद घेतली नाही. म्हणून न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका मनोज लिमये यांनी दाखल केली होती.
त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाच अवमान केला म्हणून तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार चिंथा आणि शहर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीपसिंग परदेशी, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना नोटीस बजावली असल्याचे अॅड. अतुल सूर्यवंशी यांनी कळविले आहे.