कसारा घाटात कंटेनर कोसळला

कसारा घाटात कंटेनर कोसळला

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नवीन कसारा घाटातील ( Kasara Ghat )महामार्गावर कंटेनर पलटी झाला असून यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. कंटेनर २० ते २५ फूट खोल दरीत कोसळला मात्र सुदैवाने वाहन चालक बचावला आहे.

सविस्तर वृत्त असे की, आज नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंट जवळ असणाऱ्या धबधबा पॉईंटच्या पुढील वळणावर कंटेनर क्रमांक MH 04 HY 9703 ह्या कंटेनर चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने तो घाटातील वळणावर पलटी झाला आणि तो वीस ते पंचवीस फूट खोल दरीत कोसळला.

सुदैवाने यात कंटेनर चालक कीरकोळ जखमी होऊन वाचला आहे. या अपघाताची माहिती इगतपुरी घोटी टॅबवर असणाऱ्या नरेंद्रचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिका चालक कैलास गतीर यांना समजतात त्यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस यांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी वाहन चालक गुलाब राम प्रसाद, वय ६५, रा. इलाहाबाद, उत्तरप्रदेश यांना जवळ असणाऱ्या कसारा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com