कुंभमेळ्यासाठी शिखर समिती गंठण करा; मनपाचे राज्य शासनाला पत्र

कुंभमेळ्यासाठी शिखर समिती गंठण करा; मनपाचे राज्य शासनाला पत्र

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर पूर्व तयारी कामांना गती देण्याची गरज लक्षात घेत नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वतीने

राज्य शासनाला (State Govt) शिखर समिती गठन करण्याची विनंती करण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) हा 2026-27 या कालावधीत नाशकात होणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध समित्यांचा गठन केलं जात असते. त्याच प्रामुख्याने राज्यस्तरावरून मंत्रिमंडळाची समिती जिल्हाधिकारी (Collector) यांच्या स्तरावर जिल्हाधिकारी समिती व स्थानिक समिती अशा गठीत होत असतात.

राज्यस्तरावरील शिखर समितीची स्थापना झाल्यानंतर खर्‍या अर्थाने कार्यक्रमाचे नियोजन हे सुरू होत असतें. विविध विकास कामांच्या (Development works) अनुषंगाने निधी (fund) निर्धारण केले जाते. व त्यामाध्यमातून विकास कामांची दिशा निश्चित होते. कुंभमेळ्यासाठी 2023 च्या आगामी सहा महिन्यांमध्ये नियोजन होणे अपेक्षित असून, 1 जानेवारी 2024 पासून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणे गरजेचे आहे. त्यातून 2024 ते 2026 या दोन वर्षांमध्ये नियोजनबद्ध विकास कामांना आकार देणे शक्य होणार आहे.

त्यासाठी येत्या 6 महिन्यात राज्यसभा स्तरावरील शिखर समिती तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या स्तरावरील समित्यांचे गठन करून पूर्व तयारीसाठीच्या कामाचे नियोजन केले जाणार आहे. पायाभूत सुविधांच्या निर्माण करण्यासाठीचा आराखडा तयार करणे त्यां विकासित करण्याच्या दृष्टीने नियोजनासह विविध कामांच अंतर्भाव असल्याने तातडीने याबाबत विचार व्हावा असे आशयाचे पत्र मनपांच्या माध्यमातून राज्य शासनाला पाठवण्यात आला असल्याचे वृत्त आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरांमध्ये लाखो लोकांचं आगमन होत असते, साधू ग्राम परिसरात संत महांतांची मोठी वर्दळ असते या सर्व लोकांसाठी आवश्यक असणार्‍या सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. त्या कांची पूर्तता सिंहस्थ पर्वणीच्या अगोदर पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करणे ही अत्यावश्यक बाब या पत्राद्वारे अधोरेखित करण्यात आली आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com