सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा; उद्याच घटनापीठाची स्थापना

सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा; उद्याच घटनापीठाची स्थापना

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

शिवसेना ( Shiv Sena) आणि शिंदे गटातील न्यायालयीन लढा आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर उद्या घटनापीठाची स्थापना केली जाणार असल्याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) दिले आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षावर आता सुनावणी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे....

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाने आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. शिंदे गटाकडून सुसर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा; उद्याच घटनापीठाची स्थापना
'तो' पुन्हा येणार! 'या' भागात कोसळणार मुसळधार पाऊस

केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, अशी मागणी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने त्वरीत सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोग प्रक्रीयेसंदर्भात निर्णय द्यावा, अशी विनंतीही शिंदे गटाने केली आहे.

सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा; उद्याच घटनापीठाची स्थापना
एका झटक्यात सारं काही हिरावून नेलं, ४० हून अधिक दगावले; 'पाहा' चीनमध्ये काय झाले?

त्यानंतर आता सरन्यायाधीश यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उद्या खंडपीठाची स्थापना केली जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणावर 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com