Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशगुलाम नबी आजाद म्हणतात, ...तर काँग्रेस ५० वर्ष विरोधात बसेल

गुलाम नबी आजाद म्हणतात, …तर काँग्रेस ५० वर्ष विरोधात बसेल

नवी दिल्ली

काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरुच आहे. पक्षातंर्गत निवडणुकीवरुन नेत्यांचे एकमेकांवर आरोप सुरुच आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात काँग्रेसला लागलेल्या उतरत्या कळेच्या पार्श्वभूमीवर पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवले होते. या पत्रात नेत्यांकडून पक्षसंघटनेत वरपासून ते खालपर्यंत मोठे बदल करण्याची गरज व्यक्त केली होती.

सोनिया गांधी यांना पत्र लिहणाऱ्या या नेत्यांमध्ये पाच माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकिरिणीचे अनेक सदस्य आणि काही माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. या पत्रानंतर काँग्रेस कार्यसमितीच्या झालेल्या बैठकीत सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. परंतु सात तासांच्या बैठकीतील वादळी चर्चेनंतर त्यांनाच पुन्हा अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला.

आता गुलाम नबी आजाद यांनी शनिवारी पुन्हा खळबळजनक टि्वट केले. त्यात त्यांनी म्हटले की, पक्षांतर्गच निवडणुका न घेतल्यास काँग्रेस ५० वर्ष विरोधात बसेल.

पक्षात एक टक्का लोकांचा पाठिंबा असलेल्या व्यक्ती पदावर बसले आहेत. एकदा निवडणूक झाली की पक्षातील सदस्यांचा कोणास पाठिंबा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या