महागाई, बेरोजगारी विरोधात कॉंग्रेसचा आज 'हल्लाबोल'!

महागाई, बेरोजगारी विरोधात कॉंग्रेसचा आज 'हल्लाबोल'!

दिल्ली | Delhi

राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्त्वात आज काँग्रेस (Congress) मोदी सरकारविरोधात हल्लाबोल करणार आहे. महागाई (Inflation), जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून रॅली काढण्यात येणार आहे.

‘महागाई पर हल्ला बोल’ असे कॉंग्रेसकडून रॅलीला नाव देण्यात आले आहे. काँग्रेसच्या कमिटीच्या मुख्यालयातून सकाळी 9 वाजल्यापासून बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी पक्ष मुख्यालयातून बसने दिल्लीतील रामलीला मैदावावर येऊ शकतात. या रॅलीमध्ये महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू करण्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर चौफेर हल्लाबोल करण्यात येणार आहे.

या रॅलीत दिल्लीशिवाय हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सकाळी 10 वाजता पक्ष मुख्यालयातून बसमध्ये बसून रामलीला मैदानाकडे रवाना होतील. त्याच बसमध्ये बसून राहुल गांधीही सभेला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान काँग्रेसची 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर 3,500 किमी 'भारत जोडो यात्रा' सुरु होण्यापूर्वी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान, राहुल गांधी महागाई आणि बेरोजगारी या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि जातीय सलोखा वाढवण्यासाठी देशभर प्रवास करणार आहेत. 'भारत जोडो यात्रा' हा काँग्रेस पक्षाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा जनसंपर्क यात्रा आहे. ज्यामध्ये पक्षाचे नेते तळागाळातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com