महाविकास आघाडी सरकारच्या पॅकेजवर काँग्रेस नाराज, केली ही मागणी

महाविकास आघाडी सरकारच्या पॅकेजवर काँग्रेस नाराज, केली ही मागणी

मुंबई

राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाविकास आघाडी सरकारने कडक निर्बंध घोषित केले आहेत. त्यामुळे छोट्या व्यवसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यासाठी पॅकेजची घोषणा केली असली तरी त्यावर महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस समाधानी नाही. काँग्रेसने आणखी काही घटकांचा या पॅकेजमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही घटकांसाठी पॅकेज जाहीर केले आहे. परंतु त्यात शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिकांचा सामावेश करण्यात आला नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काय आहे पत्रात

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नाना पटोले यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी घोषित केली आहे. त्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत आहे. लोकांचे जीव वाचवणं ही आपली प्राथमिकता असून त्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे सरकारबरोबर उभा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी कालावधीसाठी छोट्या व्यावसायिकांकरिता पॅकेज जाहीर केले आहे, पण या पॅकेजमध्ये आणखी काही घटकांचा समावेश करणे गरजेचे असून त्यासाठी काँग्रेसची आग्रही भूमिका आहे. त्यात शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईचे डबेवाले यांचा त्यांना आवर्जून उल्लेख केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com