Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअखेर काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; लवकरच निवडणूक

अखेर काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; लवकरच निवडणूक

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा (Congress President) तिढा आता सुटण्याची शक्यता आहे. येत्या २१ ऑगस्टपासून नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार असून ही प्रक्रिया २० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये कोण कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या नामांकनाची तारीख ठरवण्यासाठी लवकरच काँग्रेसच्या कार्यकारी समितीची (Congress Executive Committee) बैठक बोलावली जाणार आहे.

तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अध्यक्षपदाची निवडणूक (Election) न लढवल्यास गांधी घराण्याबाहेरची (Gandhi Family) व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय काँग्रेसने या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केला आहे.

दरम्यान, सध्या काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधींकडे (Sonia Gandhi) आहे. मधल्या काळात राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. मात्र, अनेक निवडणुकांत पराभव झाल्यानंतर राहुल गाधींनी अध्यक्षपद सोडले होते. यानंतर काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्तच होते.

त्यानंतर सोनिया गाधींनी पक्षाचे हंगामी अध्यक्षपद स्वीकारले. तसेच कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राहुल यांच्या नेतृत्वातच भाजपला (BJP) टक्कर दिली जाऊ शकते, असा दावा या नेत्यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या