काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

पुणे | Pune

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे आज निधन झाले आहे. ते ४६ वर्षांचे होते.

करोनावर मात केल्यानंतर त्यांना न्युमोनियाचं निदान झालं होतं. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

22 एप्रिल 2021 रोजी त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कालांतराने त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते.

करोनावर मात केल्यानंतर त्यांना न्युमोनियाचं निदान झालं होतं. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. "निशब्द! आज मी एक सहकारी गमावला, ज्याने युवा कॉंग्रेसमध्ये माझ्याबरोबर पहिले पाऊल टाकले. आजपर्यंत सोबत चाललो. निष्ठा, मैत्री, यासाठी सदैव आठवण राहील. अलविदा मित्रा! तू जिथे आहेस तिथे चमकत रहा! " असे त्यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com