Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसमध्येही भाकरी फिरणार? प्रदेशाध्यक्षांबद्दल नेत्यांमध्ये नाराजी; पक्षातील वाद चव्हाट्यावर

काँग्रेसमध्येही भाकरी फिरणार? प्रदेशाध्यक्षांबद्दल नेत्यांमध्ये नाराजी; पक्षातील वाद चव्हाट्यावर

मुंबई | Mumbai

राज्यातील काँग्रेसमधील (Congress) नेत्यांच्या मतभेदाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे, या संदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात अजूनही पक्षात खदखद कायम असून परिस्थिती बदलायची असले तर प्रदेशाध्य बदलायला हवा, असे मत पक्षातील नेत्यांनी व्यक्त केलं आहे…

- Advertisement -

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन हायकमांडची भेट घेतली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस वाचवायची असेल तर नाना पटोले यांना हटवा अशी मागणी या नेत्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar), सुनील केदार (Sunil Kedar), मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम (Sanjay Nirupam), राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे (Shivaji Moghe) यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना नाना पटोलेंविरोधात पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे.

Nashik Crime : गायींना इंजेक्शन देऊन करायचे बेशुद्ध अन्…; दोघांना अटक

दरम्यान नाना पटोलेंबाबत हायकमांडकडे तक्रार करण्याची काँग्रेस नेत्यांची ही पहिलीच वेळ नसून या आधीही महाराष्ट्रातील काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली होती. तेव्हाही त्यांनी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी केली होती.

राज्यातील कोणत्याही नेत्याशी पटोले यांचा समन्वय दिसत नसून ते एकटेच पुढे जातात कोणालाही विचारात किंवा बरोबर घेत नाहीत. नाना पटोले महाराष्ट्रातील ‘नवज्योत सिंह सिद्धू’ झाले असून काँग्रेस वाचवायची असेल तर पटोले यांना हटवावे लागेल, असं शिष्टमंडळाचं मत असल्याचं समजलं आहे.

New Parliament Inauguration : नवीन संसदेच्या उद्घाटनानिमित्त लॉन्च होणार 75 रुपयांचं नाणं, ‘अशी’ आहेत नाण्याची वैशिष्ट्ये

एकदा राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. त्यांनी नाना पटोले यांना हटवण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्यावर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पहावं लागणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या