Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसकडून पटोलेंना 'ना-ना'?

काँग्रेसकडून पटोलेंना ‘ना-ना’?

मुंबई | Mumbai

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात (Nana Patole and Balasaheb Thorat) यांच्या वादामुळे काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीवारी केली आहे.

- Advertisement -

यामध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यासह इतर नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याशी राज्यातील कॉंग्रेसच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर आता याप्रकरणी दिल्लीत वरिष्ठ पातळीवर देखील हालचाली सुरु झाल्याचे समजते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी वडेट्टीवार माध्यमांशी संवाद साधतांना म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर दिल्लीत पहिल्यांदा आलो. त्यामुळे त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत राज्यातील राजकारणावर चर्चा झाली. मात्र, महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.

Maharashtra : कॉंग्रेस आमदारावर अज्ञातांकडून हल्ला

तसेच पुढे ते म्हणाले की, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा (Assembly Speaker) राजीनामा दिला. त्यानंतर हे पद रिक्त झाले. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता अशा अनेकांच्या भावना होत्या. नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता आणि अध्यक्षपद वेळेत भरले गेले असते तर सरकार वाचले असते असे वडेट्टीवारांनी स्पष्ट केले.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव; तिघांवर गुन्हा दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या