Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामैं निकला गड्डी लेके...; राहुल गांधींची ट्रकने सवारी, Video Viral

मैं निकला गड्डी लेके…; राहुल गांधींची ट्रकने सवारी, Video Viral

नवी दिल्ली | New Delhi

काही दिवसांपूर्वी काँग्रेसने (Congress) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविल्यानंतर कर्नाटकात (Karnataka) काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. या विजयानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सतत चर्चेत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा राहुल गांधी एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत…

- Advertisement -

ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे काही दिवसांपूर्वी दिल्लीहून शिमला (Delhi to Shimla) या ठिकाणी गेले होते. त्यावेळी अंबाला ते चंदीगढ असा त्यांनी ट्रकने प्रवास केला. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला असून या व्हिडिओत ते ट्रकमधील केबीनमध्ये बसून प्रवास करतांना दिसत आहेत.तसेच यावेळी राहुल गांधी ट्रक चालकांना येणाऱ्या समस्या देखील जाणून घेतांना पाहायला मिळत आहे.

तर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत (Supriya Srinet) यांनी देखील राहुल गांधींचा हा व्हिडीओ शेअर केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, विद्यापीठातले विद्यार्थी, खेळाडू, नोकरदार वर्ग, नोकरीसाठी तयारी करणारे युवक, शेतकरी, डिलिव्हरी पार्टनर, बसमध्ये जाणारे सामान्य नागरिक आणि आता अर्ध्या रात्री ट्रक ड्रायव्हर्सशी संवाद का साधत आहेत राहुल गांधी? कारण त्यांना या सगळ्यांचा आवाज ऐकायचा आहे. या सगळ्या वर्गांना काय समस्या भेडसावत आहेत? ते राहुल गांधी जाणून घेत आहेत. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत असा विश्वास राहुल गांधी यांनी प्रत्येकाला दिला आहे असे त्यांनी सांगितले.

IPL 2023 1st Qualifier : CSK की GT? कोण जाणार थेट अंतिम फेरीत?

दरम्यान, राहुल गांधींची ही अनोखी पद्धत अनेकांना भावली असून लोक हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. तसेच कर्नाटक निवडणुकीच्या वेळी देखील राहुल गांधी यांनी बंगळुरु येथे कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्ससोबत संवाद साधला होता. त्यावेळी सुद्धा लोकांनी राहुल गांधींच्या या पद्धतीचे कौतुक केले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या