Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेस नेते राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

काँग्रेस नेते राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई | Mumbai

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात (Maharashtra) असून २४ नोव्हेंबरला इंदोरमध्ये पोहचणार आहे. मात्र त्याआधी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी (Death threats) देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे..

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरमधील (Indore)एका मिठाईच्या दुकानात पत्र पाठवत राहुल गांधींना धमकी देण्यात आली आहे. यामध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवू असे धमकावण्यात आले आहे. त्यानंतर इंदोर पोलीस (Indore Police) आणि क्राइम ब्रांच हे निनावी पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी हा खोडसाळ प्रकार असल्याची शक्यता वर्तवली असून पुढील तपास (Investigation) सुरु केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या