फडणवीसांच्या 'त्या' गौप्यस्फोटावर पटोलेंचे प्रत्युत्तर; म्हणाले,महाराष्ट्रातील...

फडणवीसांच्या 'त्या' गौप्यस्फोटावर पटोलेंचे प्रत्युत्तर; म्हणाले,महाराष्ट्रातील...

नाशिक | Nashik

नाशिक पदवीधरमधून सलग तीन वेळा कॉंग्रेसकडून आमदार राहिलेल्या डॉ. सुधीर तांबेंना (Dr.Sudhir Tambe) यंदा चौथ्यांदा या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पंरतु, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ.तांबेंनी माघार घेत पुत्र सत्यजित तांबेंचा (Satyajit Tambe) अपक्ष अर्ज भरल्याने नाट्यमय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसला आपल्या हक्काची जागा सोडावी लागली होती.

त्याबदल्यात कॉंग्रेसला ठाकरे गटाच्या वाट्याला (Thackeray Group) आलेली नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा देण्यात आली. तर ठाकरे गटाला नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) सोडण्यात आला. यानंतर ठाकरे गटाने याठिकाणी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता पाटील यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार प्रचार सुरु केल्याचे दिसत आहे.

त्या पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचे टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिले होते, असे म्हणत महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. त्यावर आता पटोले यांनी भाष्य केले आहे.

यावेळी भाजपवर टीका करतांना पटोले म्हणाले की, वाघ बिबटे गुजरातला नेत आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात सूरत लूट होत होती, आता राज्याला लुटून गुजरातमध्ये सुरतेला देण्याचे काम सुरू आहे. तसेच हे सरकार शिवाजी महाराज यांच्या विचाराच्या विरोधात काम करत आहे. भाजपला उमेदवार का मिळाला नाही, हे तुम्ही का दाखवत नाही? आम्ही प्रामाणिक आहोत तर अप्रामाणिक लोकांनी आरोप करू नये. आज त्यांचे दिवस आहे उद्या आमचे दिवस येतील. आम्ही विचारांची लढाई लढतो आहे. मात्र दुसऱ्याची घर फोडायला भाजपला आवडत. मात्र जेव्हा त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना कळेल, असे त्यांनी सांगितले.

तसेच पुढे देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) केलेल्या आरोपांवर बोलतांना पटोले म्हणाले की, एवढ्या कालावधींनंतर फडणवीसांना आता हे का सुचले? आमचे मित्र आता उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातील जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com