Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामविआच्या 'त्या' चुकीवर नवा वाद; अजित पवारांच्या आरोपावर नाना पटोलेंचा पलटवार

मविआच्या ‘त्या’ चुकीवर नवा वाद; अजित पवारांच्या आरोपावर नाना पटोलेंचा पलटवार

मुंबई | Mumbai

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना लक्ष्य केलं. ‘नाना पटोलेंनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलात्यानंतर राजीनाम्याची माहिती दिली,’ असा आरोप अजित पवारांनी केला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला असून अजित पवार खोटं बोलत आहेत, असं थेटपणे पटोले म्हणाले.

- Advertisement -

नाना पटोले म्हणाले की, अजित पवार खोटं बोलत आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत आम्ही अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना भेटलो. आत्ताच राजीनामा देऊ नका, असं ते म्हणाले होते. परंतु त्यांना माहिती होतं. ते आता खोटं बोलत आहेत. मी अध्यक्ष नव्हतो तर उपाध्यक्ष त्यांचा होता. त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबनही रद्द

“मी अध्यक्षपदावर नव्हतो, तर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता आली असती. ती त्यांनी केली नाही. एक वर्ष आम्ही अध्यक्षांची नेमणूक केली नाही, हे अजित पवारांनी मान्य केलं. पण, उपाध्यक्षांनी अध्यक्षांचे अधिकार वापरले नाहीत,” असेही नाना पटोलेंनी सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

काय म्हणाले अजित पवार?

आमचे त्यावेळचे (महाविकास आघाडी सरकारच्या काळातील) विधानसभा अध्यक्ष यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावरच त्यांना सांगितलं. एकतर तो द्यायला नको होता. तो राजीनामा दिल्यावर लगेच विधानसभा अध्याक्षांची निवडणूक लावून तो विषय संपवला पाहिजे होता.

मी यासाठी एकट्याला दोषी धरत नाही. आमच्या महाविकास आघाडीकडून तो विषय तातडीने धसास लागला असता, तर तिथं विधानसभा अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सर्व गोष्टी झाल्या असत्या. मोठा काळ विधानसभेचे उपाध्यक्ष काम पाहत होते. अध्यक्षांची जागा रिक्त राहिली होती,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

त्यानंतर बऱ्याच काळापर्यंत विधानसभा उपाध्यक्षच सभागृहाचें कामकाज बघत होते, त्यामुळं नेमकी ती (अध्यक्षपदाची) पोस्ट रिकामी राहिली होती. या घटना घडल्या की ताबडतोब त्यांनी (शिंदे गटाने) ती पोस्ट भरण्याचा प्रयत्न केला. बहुमत त्यांच्याकडं असल्याने त्यांनी ती पोस्ट भरली. जर ती पोस्ट आधीच भरली असती तर त्याच अध्यक्षांनी या १६ आमदारांना अपात्र ठरवलं असतं

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या