काँग्रेसचा 'हात' सोडत 'या' बड्या नेत्याने पकडली 'सायकल'ची सीट

काँग्रेसचा 'हात' सोडत 'या' बड्या नेत्याने पकडली 'सायकल'ची सीट

नवी दिल्ली । New Delhi

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षातील जी-23 या नेत्यांच्या समुहातील प्रमुख सदस्य माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी कॉंग्रेस (congres) पक्षाला रामराम करत समाजवादी पक्षाच्या 'सायकलची सीट' धरली आहे.

समाजवादी पक्षात (samajwadi party) प्रवेश करताच कपिल सिब्बल यांना राज्यसभेची उमेदवारी (Rajya Sabha candidate) जाहीर करण्यात आली आहे. सिब्बल यांनी अधिकृतपणे समाजवादी पक्षाचे सदस्यत्व घेतलेले नसले तरी ते सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत दाखल होणार आहेत.

दरम्यान, कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी १६ मे रोजीच आपला राजीनामा काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Congress party president Sonia Gandhi) यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती दिली. कपिल सिब्बल हे उत्तर प्रदेशमधून काँग्रेसच्या कोट्यातून खासदार (mp) आहेत. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त दोनच उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे सिब्बल यांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी इतर मार्गांची चाचपणी केली असल्याची चर्चा सुरू होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com