Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन

मुंबई | प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. एकनाथ गायकवाड हे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते.

- Advertisement -

गेली काही दिवसांपूर्वी एकनाथ गायकवाड यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज सकाळी दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

कोण होते एकनाथ गायकवाड?

एकनाथ गायकवाड हे काँग्रेस मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविले होते.

साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत वास्तव्यास होते. त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीत त्यांचा सहभाग होता.

सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या