Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यागावची पाटीलकी कोण सांभाळणार?

गावची पाटीलकी कोण सांभाळणार?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता प्रदेश पातळीवरून घेण्यात येत असलेल्या निर्णयामुळे होणारी अंतर्गत नाराजी, निर्णय प्रक्रियेत स्थानिक परंतु प्रदेश कार्यकारिणीत असलेल्या पदाधिकार्‍यांकडे होणारे दुर्लक्ष, तसेच स्थानिक पातळीवर शहरात कमी होत असलेला पक्षाचा प्रभाव (Party influence), यामुळे काँग्रेस पक्ष (congress party) कार्यकर्त्यांअभावी ओस पडत चालला असताना अशा परिस्थितीत या गावची पाटीलकी कोण सांभाळणार हा प्रश्न शहरवासियांना पडला आहे.

- Advertisement -

एका दशकापूर्वी संपूर्ण देशावर सत्ता असणार्‍या काँगे्रस पक्षाची नाशिक (nashik) शहरावर देखिल पकड होती. मात्र गेल्या दहा वर्षाचा इतिहास पाहिला तर या पक्षाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाल्याचे पहावयास मिळत आहे. या वर्षांच्या सुरवातीला होणार्‍या महापालिकेच्या (Municipal Corporation) सातव्या पंचवार्षिक निवडणुकीचे (election) बिगूल वाजले आहे. परंतू या पक्षाचा गाव सांभाळणारा पाटील अदयाप पक्षाला देता आलेला नाही.

ज्यांचेकडे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. ते प्रभारी सारखेच काम पहाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पक्षाने त्याच्याच पक्षाचा परंतु काही कारणाने पक्ष सोडून गेलेल्या एका अभ्यासू, हुशार शिलेदाराला पाटीलकी देण्याचा शब्द देत आपल्या पक्षात घेतले. मात्र त्या शिलेदाराला पक्षात घेताना पुन्हा तोच कित्ता गिरवला गेला.

त्याबाबत स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले न गेल्याची ओरड होऊन नाराजी नाट्य रंगले. ते काही दिवसांनी संपले देखिल. त्यामुळे आता गावाची पाटीलकी या अभ्यासू शिलेदाराकडे सोपविण्याची अधिकृत घोषणा केली जाईल असे वाटत असताना अद्याप ही घोषणा न झाल्याने कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे. त्याचबरोबर आपल्याला पाटीलकीचा शब्द देऊनही तो पाळला नसल्याची भावना या शिलेदाराच्या मनात रूजल्याने गेल्या काही दिवसात शहरात घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये या शिलेदाराची गैरहजेरी बरेच काही सांगून जात आहे.

अशी सर्व वाटचाल काँग्रेस पक्षाची (congress party) सुरू असताना काही दिवसांपूर्वी तालुकाध्यक्षांबाबत बदलाचा निर्णय घेताना प्रदेश कार्यकारिणीत असलेल्या स्थानिक नेत्यांना न विचारता निर्णय घेण्यात आल्याने दोन दिवसातच प्रदेशाध्यक्षांना आपला निर्णय मागे घेण्याची वेळ आली. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणीवर (Region Executive) असूनही आपल्याला विचारात घेत नसल्याची भावना या पदाधिकार्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. यातून ते आपली नाराजी लपवू शकलेले नाहित.

शहरात या पक्षाची आज जी काही बोटावर मोजण्याइतकी नेते मंडळी आहेत ते आपल्या स्वकर्तृत्वाने पक्ष टिकवून ठेवत आहे. अजुनही ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्याच्या राजकीय कारकिर्दीत पक्षाचा वाटा असला तरी आज मात्र पक्षाला अशा निष्ठावानांच्या मदतीची गरज असताना त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही ही मोठी शोकांतिका आहे.

ते नाराज आहेत पण एकनिष्ठ आहेत त्यामुळे ते कधी पक्षाला सोडचिठ्ठी देतील असे वाटत नाही तसे ते बोलूनही दाखवतात. त्यांच्याकडे प्रदेश कार्यकारीणीकडून विश्वासाने काही जबाबदार्‍या देण्याची गरज आहे. सामान्य कार्यकर्त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याची गरज आहे. नाही तर आज कार्यकर्त्यांअभावी ओस पडत चाललेल्या या गावाची पाटीलकी कोण स्वीकारणार हा मोठा प्रश्न सध्यातरी दिसत आहे.

महिला काँग्रेस शहराध्यक्षपदी खैरे

नाशिक शहर काँग्रेस शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीचे अजूनही भिजत घोंगडे आहे.दुसरीकडे मात्र नाशिक शहर महिला काँग्रेस पदाधिकार्‍यांची नियुक्ती पक्षाने केली आहे. नाशिक शहराध्यक्षपदी विद्यमान शहराध्यक्ष वत्सला खैरे यांना पुन्हा संधी दिली आहे तर मालेगाव शहराध्यक्षपदी अनिता अवस्थी यांची नियुक्ती पक्षाने केली आहे. याशिवाय महिला काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये नाशिकमधील चौघींना स्थान देण्यात आले आहे.त्यामध्ये सचिवपदी डॉ.सुचेता बच्छाव, स्वाती जाधव, मुन्वर सुलताना, सायली पालखेडकर यांची नियुक्ती झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या