Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! डॉ.सुधीर तांबेंवर काँग्रेसची कारवाई; हायकमांडने दिले 'हे' आदेश

मोठी बातमी! डॉ.सुधीर तांबेंवर काँग्रेसची कारवाई; हायकमांडने दिले ‘हे’ आदेश

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधरसाठी (Nashik Graduate Constituency) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले होते. नाशिक पदवीधरसाठी कॉंग्रेसकडून (Congress) डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यासाठी कॉंग्रेसने एबी फॉर्म देखील तांबे यांना दिला होता.

- Advertisement -

परंतु,डॉ. तांबेंनी ऐनवेळी माघार घेत पुत्र सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कॉंग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाराजी व्यक्त करत डॉ.तांबे यांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता याप्रकरणाची काँग्रेस हायकमांडने गंभीर दखल घेत डॉ.तांबे यांच्यावर कारवाई केली आहे.

काँग्रेस हायकमांडकडून डॉ.सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने ही कारवाई केली असल्याचे पत्र काँग्रेस हायकमांडकडून जारी करण्यात आले आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. सुधीर तांबे यांचे हे निलंबन असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या