काँग्रेसचा आज मेळावा व आढावा बैठक

आ. पटोले, आ. थोरात यांची उपस्थिती
काँग्रेसचा आज मेळावा व आढावा बैठक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले (State Congress President MLA Nana Patole)व काँग्रेस विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने (Nashik City and District Congress Committee) रविवारी ( दि.31) 3 वाजता तूपसाखरे लॉन्स, मुंबई नाका नाशिक येथे मेळावा व आढावा बैठक( Review Meeting) आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीच्या नियोजनाबाबत शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नाशिक काँग्रेसचे सहप्रभारी ब्रीज दत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन महात्मा गांधी रोड नाशिक येथे बैठक संपन्न झाली.

बैठकीचे प्रास्ताविक करताना शरद आहेर यांनी सांगितले की, 9 - 15 ऑगस्ट दरम्यान होणार्‍या आझादी की गौरव पदयात्रा निमित्ताने पंचवटीतून गांधी ज्योत ह्या ठिकाणावरून पदयात्रेला सुरुवात होईल. या दरम्यान नाशिक शहरातील सर्वच प्रभागातून 75 किलोमीटर अंतर सर्वच नेते, पदाधिकारी ह्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. तसेच स्वातंत्र्य चळवळीत योगदान असलेल्या कुटुंबियांच्या भेटी देखील घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणाला भेटी दिल्या जातील.

महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांनी आपपल्या प्रभागात ह्या पदयात्रेचे स्वागत करतील. चौकाचौकात पत्रक, बॅनर, झेंडे लावून वातावरण निर्मिती केली जाईल. यावर पदाधिकार्‍यांनी तयारी करण्याचे आवाहन आहेर यांनी केले.

रविवारी होणार्‍या प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले व काँग्रेस विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार्‍या मेळाव्याची जय्यत तयारी करुन अधिकाधिक लोकांना या मेळाव्यात सहभागी करावे, असे ब्रीज दत्त यांनी सांगितले ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

यावेळी डॉ. शोभा बच्छाव, शाहू खैरे, वत्सला खैरे, राहुल दिवे, सुरेश मारु, विजय राऊत, वसंत ठाकूर, ज्ञानेश्वर काळे, हनिफ बशीर, स्वप्निल पाटील आदींनी मार्गदर्शन केले.

बैठकीसाठी विजय पाटील, भरत पाटील, कैलास कडलग, ईशाक कुरेशी, जावेद पठाण, अरुण दोंदे, फारुख कुरेशी, दाऊद शेख, गौरव सोनार, देवेन मारु, रामकिसन चव्हाण, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

वक्तव्याच्या निषेधाचा ठराव

राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधाचा ठराव नाशिक शहर काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. याबाबतचा ठराव शरद आहेर यांनी मांडला तर सर्वच पदाधिकार्‍यांनी हात उंचावून ठरावाला अनुमोदन दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com