५० लाखांची मागितली लाच; स्वीकृत नगरसेवकाचा प्रताप

५० लाखांची मागितली लाच; स्वीकृत नगरसेवकाचा प्रताप

ठाणे | Thane

अनधिकृत दुकान तोडण्याबाबत महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेण्यासाठी दुकानदाराकडून तब्बल ५० लाख रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकाला (Corporator) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (acb) जेरबंद केले आहे…

सिद्धेश्वर कामुर्ती (६२) (Siddheshwar Kamurti) असे या लाचखोर नगरसेवकाचे नाव आहे. कामुर्ती हे कॉंग्रेसचे (congress) स्वीकृत नगरसेवक आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडीमधील (Bhiwandi) पद्मानगर भाजी मार्केट (Padmanagar Vegetable Market) येथे तक्रारदरांचे दुकान आहे. या ठिकाणी सुमारे १०० दुकाने आहेत.

अनधिकृत दुकाने तोडण्याबाबत स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती यांनी महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी कामुर्ती यांनी प्रत्येक दुकानामागे २ लाखाप्रमाणे एकूण तब्बल दोन कोटींची लाच मागितली.

तक्रारदाराने पैसे देण्यास नकार देत या लाचेबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) लेखी तक्रार दिली. तक्रारीनंतर एसीबीने केलेल्या पडताळणीमध्ये कामुर्ती यांनी तडजोडीअंती तक्रारदाराकडे ५० लाखांची लाच मागितल्याचे निदर्शनास आले.

त्यांनतर एसीबीने भिवंडीमध्येच सापळा रचला. तक्रारदाराकडून ५० लाखांची लाच घेताना कामुर्ती यांना रंगेहात पकडण्यात एसीबीला यश आले. नगरसेवक कामुर्ती यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.