Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याKarnataka Election : बंगळुरूत मध्यरात्री हाय होल्टेज ड्रामा; काँग्रेसने जिंकलेली जागा गमावली,...

Karnataka Election : बंगळुरूत मध्यरात्री हाय होल्टेज ड्रामा; काँग्रेसने जिंकलेली जागा गमावली, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) १३५ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने (Congress) स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. काल रात्रीपर्यंत निवडणूक आयोगाकडून निकाल स्पष्ट झाला होता.परंतु, बंगळुरुतील जयनगर मतदारसंघातील जागेचा निकाल लागणे बाकी होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या जागेची मतमोजणी चालू होती. त्यानंतर रात्रभर झालेल्या हायहोल्टेज ड्रामामुळे ही जागा आता भाजपला मिळाली आहे…

- Advertisement -

बंगळुरूतील जयनगर मतदारसंघासाठी (Jayanagar Constituency) मतमोजणी सुरू असताना सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी आघाडीवर होत्या. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी जयनगर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांना विजयी घोषित करण्यात आले होते. परंतु, या मतमोजणीवर भाजपने आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांनी पुन्हा फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

Weather Updates : देशातील ‘या’ राज्यांमध्ये उष्णतेची लाट

यानंतर मध्यरात्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डि. के. शिवकुमार (D.K.Shivakumar) सौम्या रेड्डी यांचे वडील आणि कार्यकारी अध्यक्ष रामलिंगा रेड्डीसह त्यांची कायदेशीर टीम मतमोजणी केंद्रावर आली. त्यानंतर फेरमोजणी करण्यात आली. या फेरमोजणीत भाजप उमेदवाराचे सकाळी अवैध ठरवलेली मते वैध ठरवण्यात आली. त्यामुळे भाजप उमेदवाराच्या मतमोजणीची आकडेवारी वाढली. परिणामी, भाजपा उमेदवार राममूर्ति यांना पहाटे विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे अवघ्या १६ मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी यांना पराभव स्वीकारावा लागला.

पहाटेच्या शपथविधीबाबत भाजप नेत्याचे मोठे विधान; म्हणाले, उद्धव ठाकरेंना…

त्यानंतर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेल्या मतांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी (Soumya Reddy) यांना ५७ हजार ७८१ मते मिळाली असून राममूर्ति यांना ५७ हजार ७९७ मते मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसने ही जागा गमावली असल्याने कर्नाटकात काँग्रेसची संख्या १३५ झाली असून भाजपाची ६६ इतकी झाली आहे.

Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान, अनंतनागमध्ये भारतीय लष्कराची कारवाई

दरम्यान, भाजपचा उमेदवार विजयी ठरताच भाजपने मध्यरात्रीच फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. तर दुसरीकडे भाजप खासदार तेजस्वी सूर्या (MP Tejashwi Surya) भाजप नेते आर अशोक आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मतदारांमध्ये फेरफार केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे याविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे कॉंग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या