योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

नाशिक शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांकडून हाथरस घटनेचा निषेध
योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

नाशिक| Nashik

नाशिक शहर व ग्रामीण जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून आज नाशिकमध्ये हाथरस येथील मुलीवर झालेल्या अन्याय, अत्याचार व खून प्रकरणी निषेध व धरणे आंदोलन आज करण्यात आले.

यावेळी कॉंग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजप सरकारचा निषेध केला. योगी आदित्यनाथ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन यावेळी करण्यात आले.

घटनास्थळी परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी शहर पोलिसांनी चौफेर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच दहन केलेला विझवून रस्त्यावरून बाजूला करत झालेली वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

दरम्यान, राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है!, मोदी सरकार हाय हाय! योगी सरकार हाय हाय! च्या घोषणादेखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

परिसरात कॉंग्रस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे काही काळ याठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली बघायला मिळाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com