
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi Government) विरोधकांना संपवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. मोदी सरकारच्या (Modi Government) या दहपशाहीला काँग्रेस (Congress) पक्ष भीक घालत नाही. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आजारी असून वयाच्या ७० व्या वर्षी त्यांना चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात आहे...
मोदी सरकारच्या या हुकूमशाही विरोधात काँग्रेस पक्ष मंगळवार दि. २६ जुलै रोजी पुन्हा एकदा शांततापूर्ण सत्याग्रह करून या कारवाईचा विरोध करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हटले आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक शहर - जिल्हा काँग्रेसतर्फेही सत्याग्रह करण्यात येणार आहे.
मोदी सरकारच्या सूडाच्या राजकारणाविरोधात मंगळवारी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर (Mahatma Gandhi Statue) सकाळी १० वाजता सत्याग्रह केला जाणार असून जोपर्यंत सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना ईडी (ED) कार्यालयातून मुक्त केले जात नाही, तोपर्यंत सत्याग्रह सुरुच राहणार आहे.शहर-जिल्हा काँगेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह करण्यात येणार आहे.
२१ तारखेला सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. आता पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही पाच दिवस दररोज १०-१० तास ईडीने चौकशी केली. या चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही व होणार नाही. ईडीचे अधिकारी केंद्रातील त्यांच्या ‘बॉस’च्या इशाऱ्यावर नाचत आहेत.
चौकशीच्या नावाखाली विरोधकांना त्रास देण्याचे भाजपाचे राजकारण फारकाळ टिकणार नाही.काँग्रेस पक्षाने सुडाचे राजकारण कधीच केले नाही पण केंद्रात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सरकारने लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देत आहे.
काँग्रेस पक्ष अशा कोणत्याही दडपशाहीला घाबरत नाही. काँग्रेस पक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. हुकुमशाही सरकारला जनताच त्यांची जागा दाखवेल. राज्यभर जिल्हा मुख्यालयी जिल्हा काँग्रेसचे नेते पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदारांसह सर्व विभाग, सेल, आघाडी यांचे पदाधिकारीही सत्याग्रहात सहभाही होऊन केंद्र सरकारच्या (Central Government) अत्याचाराचा निषेध करतील, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी म्हटले आहे.