Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याईडी कार्यालयासमोर आज काँग्रेसचे आंदोलन

ईडी कार्यालयासमोर आज काँग्रेसचे आंदोलन

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

केंद्रातील भाजप सरकारने राजकीय द्वेषातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) व राहुल गांधी ( Rahul Gandhi )यांना नॅशनल हेरॉल्ड ( National Herald) प्रकरणी ईडीची ( ED ) नोटीस पाठवली आहे.

- Advertisement -

भाजपच्या या दडपशाहीविरोधात काँग्रेस आज (दि.13 जून) मुंबई आणि नागपूर येथील ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ही माहिती दिली.

केंद्रातील भाजप सरकार महागाई, पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, रुपयाची घसरण, अर्थव्यवस्थेची घसरगुंडी, काश्मीर पंडितांची हत्या व पलायन आदी मुख्य मुद्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे मुद्दे उकरून काढत आहे, असाही आरोप लोंढे यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या