
नाशिक । प्रतिनिधी Nashik
भारतातील महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे माजी चेअरमन केशुब महिंद्रा यांचे बुधवारी (दि. 12) वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. नाशिकच्या जडणघडणीत महिंद्रा अॅण्ड महिंद्रा व केशुब महिंद्रा यांंचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी (दि.23) सायंकाळी चार वाजता हॉटेल बीएलव्हीडी, त्र्यंबकरोड, सातपूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोकसभेचे नियोजन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या समवेत नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी, निपमचे अध्यक्ष प्रकाश बारी, मी नाशिककरचे पीयूष सोमाणी, क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल पाटील, नरेडकोचे सेक्रेटरी सुनील गवांदे, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे माजी जनरल मॅनेजर डॉ. अशोक सोनवणे करत आहेत.
नाशिक शहरातील व जिल्ह्यातील सर्व विविध औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी या शोकसभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी दिली.