
नाशिक । प्रतिनिधी
लोकशाहीचा दीप सतत तेवत रहावा,यासाठी सर्व आमदारांनी सकारात्मक कार्य करावे. भारत देश आणि जनतेचे कल्याण हेच शेवटचे लक्ष असावे. राज्याच्या विकासासाठी ज्या पद्धतीन नवीन पॉलिसी निर्मिती करतात. त्यातूनच देशाला शक्तिशाला बनवायचे आहे, असे विचार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या राष्ट्रीय विधायक परिषदेच्या समारोप समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटतर्फे आयोजित पहिल्या ‘राष्ट्रीय विधायक संमेेलन, भारत’ च्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस,गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोर्हे, लोकसभेच्या माजी सभापती डॉ. मीरा कुमार व शिवराज पाटील चाकुरकर विशेष अतिथ म्हणून उपस्थित होते.
तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय विधायक संमेलनाचे प्रमुख संयोजक समन्वयक राहुल विश्वनाथ कराड उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम लोकशाहीची कल्पना आखून अमलात आणली. त्यासाठी लोकशाहीची सुरक्षा करने ही सर्वांची जवाबदारी आहे. शासन, प्रशासन आणि न्याय व्यवस्था या लोकशाहीच्या तीन स्तंभाची सुरक्षा करावी. त्यासाठी सर्व राजकीय दलांनी एकत्रित येऊन देशाच्या विकास आणि हितासाठी कार्य करावे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज जी २०चे नेतृत्व देशाकडे आले आहे. यातून देश आर्थीक स्वरूपत सक्षम बनत आहे.
राज्यपाल बैस म्हणाले, देशातील महत्वाचे प्रश्न आमदारांना समजण्यासाठी या व्यासपीठाने संधी उपलब्ध करून दिली आहे. लोकशाहीसाठी संसदीय समिती ही प्रभावी माध्यम आहे. आमदारांनी विधानसभेत पूर्ण वेळ देऊन सर्व समस्या समजावून घ्यावे.
समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आमदारांनी कार्य करावे. नव्या संसदेत तंत्रप्रणालीचा स्वीकार करावा. सर्व श्रेष्ठ अभ्यास व विकासाचे नवे मॉडेल हेच या संमेलनाचे मुख्य वैशिष्ठ आहे.
प्रमोद सावंत म्हणाले, नव्या भारतात परिवर्तन आणण्यासाठी ही परिषद अत्यंत महत्वाची आहे. संसदीय कार्यप्रणालीला उत्तम करण्यासाठी व देशाच्या विकासासाठी प्रत्येक राज्याने या पद्धतीच्या संमेलनाचे आयोजन करावे.सर्व समस्या निपक्षपणे मांडावी व त्यातूनच राष्ट्र निर्माणासाठी आमदारांनी योगदान द्यावे.प्रत्येक राज्य विकसीत होणे गरजेचे असून त्या पद्धतीने विचाराधारा विकसीत व्हावी.
हरीवंश सिंह म्हणाले, बदलत्या जगात नव्या कायद्याची गरज आहे.अशा वेळेस आमदारांनी पुढाकार घेऊन कार्य करावे. येणार्या काळातील सर्व आव्हांना तोड देत डायनॅमिक बनने गरजेचे आहे.आर्थीक स्वरूपात सक्षम होऊन सामाजिकतेची गरज आहे. तसेच जुन्या कायद्यांमध्ये बदल करून नव्या कायद्याची निर्मिती करावी. सुंदर समाज निर्मितीसाठी आमदारांना विशेष प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
या सम्मेलनात देशातील विधानसभा आणि विधान परिषदेचे अध्यक्ष ,१७८० आमदार व ८० मंत्री उपस्थित होते. राहुल कराड यांनी राष्ट्रीय विधायक परिषदेच्या तीन दिवसीय कार्यक्रमाची माहिती दिली.राहुल नार्वेकर यांनी विचार मांडले. मल्लिकाअर्जुन यांनी व्हीडिओ संदेश दिला.