कोरोनाने वाढवली चिंता; आरोग्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

कोरोनाने वाढवली चिंता; आरोग्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

नवी दिल्ली|New Delhi

गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या (Corona) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. दोन दिवसातच कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे आढळून आले, यात बुधवार आणि गुरवारी २३०० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी उद्या गुरुवार (दि. ०७) रोजी बैठक बोलावली आहे (Corona review meeting).

कोरोनाने वाढवली चिंता; आरोग्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
घराणेशाही मोडीत काढण्यासाठी हनुमानासारखं कठोर व्हावं लागतं; पंतप्रधानांचा कार्यकर्त्यांशी संवाद

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार (Central Government)सतर्क झाले आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून या समस्येला आळा घालण्यासाठी त्यांनी उद्या (दि. ७) राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असून या बैठकीत विविध राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, 10 आणि 11 एप्रिल रोजी देशभरात जनजागृती आणि कोरोनाला तोंड देण्यासाठी तसेच, सज्जतेचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही ५,३३५ नोंदवण्यात आली. हा आकडा गेल्या १९५ दिवसातील सर्वोच्च आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी २३ सप्टेंबर रोजी ५,३८३ रुग्ण संख्या नोंदवली गेली होती. यासह, देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या २५,५८७ झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण पाच लाख ३० हजार ९१६ मृत्यू झाले आहेत.

कोरोनाने वाढवली चिंता; आरोग्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; काकाने केली पुतण्याची चाकूने भोसकून हत्या
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com