फी साठी सक्ती, नाशिकमधील पाच शाळांना नोटीस

फी साठी सक्ती, नाशिकमधील पाच शाळांना नोटीस
वर्षा गायकवाड

मुंबई

कोरोनाच्या परीस्थितीमुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा (School) बंद आहे. परंतु विद्यार्थ्यांना मात्र फी भरावी लागत आहे. शाळांकडून फीसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने जारी केलेल्या नियमांचे पालन होत नाही. यामुळे राज्यातील ३२ शाळांना नोटीस पाठवली आहे. त्यात नाशिकमधील ५ शाळा आहे. ‘ शाळांची मान्यता रद्द का करु नये? अशी विचारणा या नोटीशीत करण्यात आली आहे. नोटीस पाठवण्यात आलेल्या शाळांमध्ये मुंबई आणि नवी मुंबईतील १०, पुण्यातील २०, नाशिकमधील ५, नागपुरातील ५ आणि औरंगाबादमधील २ शाळांचा समावेश आहे. पालकांच्या तक्रारीनंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ही कारवाई केली आहे.

वर्षा गायकवाड
ई़डी चौकशी :एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार

कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थितीमुळे काही पालकांनी शाळेची फी भरली नाही. अशा विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक संस्थेनं शिक्षणापासून वंचित ठेवलं आहे. ऑनलाइन वर्गात प्रवेश दिला जात नाही. इतकंच नाही काही शाळांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्या पत्त्यावर शाळा सोडल्याचा दाखला पाठवला आहे. शिक्षण संस्थाना आणि व्यवस्थापकांना कोणत्याही विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून दूर ठेवता येणार नाही. शुल्क भरण्यासाठी दबाव आणणं आणि शाळेतून काढून टाकणं अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com